दिवाळीमध्ये फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घ्यावी

दिवाळीमध्ये फटाके फोडताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी -  While bursting firecrackers in Diwali, be careful.

फटाके फोडल्यामुळे डोळ्यावर होणारे परिणाम


दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. अगदी बालगोपालांपासून ते वडीलधाऱ्या मंडळींपर्यंत सर्व मंडळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.

दिवाळी (Diwali) हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी हा सण दिवे आणि फटाके याशिवाय पूर्ण होत नाही. पण दिवाळीत फटाके फोडतांना काळजी घ्यायला पाहिजे. कारण फटाक्यांमुळे संपूर्ण शरीराला तसेच डोळ्यांना गंभीर दुखापती होऊ शकते. 

अनेक फटाक्यांमध्ये स्फोट होण्यासाठी गन पावडर चा उपयोग केला जातो त्यामुळेच फटाक्यांचा स्फोट होतो. त्यामुळे कोणत्या फटाक्याचा किती स्फोट होईल हे सांगणे थोडेसे कठीण आहे त्यामुळे फटाके फोडताना सर्वांनी कुठेही इजा होणार नाही ना याची काळजी घेऊनच दिवाळीमध्ये फटाके फोडले पाहिजेत.

 दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणाचा स्तर कळस गाठतो, हवेतील नायट्रोज ऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइडची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे दमा आणि श्वसन विकाराच्या रुग्णांना दिवाळीच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्रास जाणवतो. तसेच वाढलेल्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ करणे, लाली येणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे जाणून येतात.

फटाक्यामुळे डोळ्यावर होणारे परिणाम आणि लक्षणे


काही व्यक्ती जर कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असतील तर अशा व्यक्तींनी दिवाळीमध्ये फटाके फोडताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण काँटॅक्ट लेन्सेस दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात आल्यास डोळ्यांची जळजळ व्हायला लागते. काही वेळा जास्त उष्णतेमुळे कॉन्टॅक्ट लेन्स हे डोळ्यांमध्ये पघळू शकतो आणि डोळ्याला इजा होऊ शकते त्यामुळे काँटॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी फटाके फोडतांना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

फटाके फोडल्यामुळे डोळ्याला खालील लक्षणे जाणवू शकतात.

फटाके फोडताना फटाक्याचा जर जवळील संबंध आला तर त्यामुळे डोळ्यांना काही लक्षणे जाणू शकतात त्यापैकी काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत.

• फटाक्याला लागलेले खराब हात जर डोळ्याला लावले तर त्यामुळे डोळ्याला पाणी येते, डोळा लाल होतो, डोळ्यात टोचल्यासारखे वाटते आणि त्यामुळे डोळ्याला Allergic conjunctivitis आजार होतो.

• फटाक्याचा स्फोट झाल्यामुळे तिथे उष्णता तयार होते व त्या उष्णतेमुळे डोळ्याला कोरडेपणा होतो त्यामुळे डोळे जळजळ करणे असा त्रास जाणू शकतो.

• काही वेळा जास्त उष्णता तयार होऊन डोळ्याचा वरील भाग जसे की पापणीचे केस, पापणी, पारपटल, जळू शकते आणि अशा केसेस मध्ये डोळ्याला खूप जास्त इजा होते आणि यामध्ये डोळ्याची पूर्ण नजरही जाऊ शकते.

• फटाका जोरात फुटल्यामुळे त्याच्या आजूबाजूची माती दगड जोरात उडून जर डोळ्याला लागली तर त्यामुळे डोळ्याला इजा होऊन Corneal ulcer नावाचा आजार होतो आणि त्यामुळे डोळ्यावर ती टिक पडते Corneal opacity.

• जे व्यक्ती कॉन्टॅक्ट वापरत आहे अशा व्यक्तींनी फटाके फोडताना जर जास्त उष्णता उत्पन्न तयार झाली तर डोळ्यामधील कॉन्टॅक्ट लेन्स हा वितळतो व डोळ्याला चिकटल्या जातो त्यामुळे ही डोळ्याला खूप जास्त इजा होते.

• फटाके फोडताना संपूर्ण शरीराला इजा होऊ शकते त्यामुळे सर्वांनी फटाके फोडताना काळजी घेऊनच फोडावेत.

दिवाळीमध्ये डोळ्यांचे खालील प्रमाणे काळजी घ्यावी.


• हाताला फटाक्याची दारू लागली असल्यामुळे डोळे वारंवार चोळू नयेत त्यामुळे डोळ्याला एलर्जी होऊ शकते किंवा इजा होऊन जंतू संसर्ग होऊ शकतो.

• फटाके फोडणे झाल्याच्या नंतर डोळे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे.

• डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार स्वच्छ पाण्याचे धुवा.

• डोळ्यात कोणतेही रसायन अथवा फटाक्यामुळे इजा झाली असेल तर डोळ्याची छेडछाड न करता त्वरित नेत्रातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


फटाके फोडताना घ्यावयाची काळजी


• फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडावे.

• फटाके फोडतांना गॉगल्स घालावा.

• लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे.

• फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.

• फटाके चेहरा, केस व कपड्यांपासून दूर ठेवा.

• फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.

• फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.









Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying