आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करणे बाबत

परिपत्रक : कार्यालयीन शिस्त

विषय: आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख इतर अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करणे बाबत... चे परिपत्रक दिनांक 7/10/2022

आरोग्य सेवा आयुक्तालयाचे अधिनस्त विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख इतर अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तरीही बहुतांशी विभाग प्रमुख प्रादेशिक, विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी हे शिस्तीचे पालन करत नसल्याचे बाब निदर्शनात येत आहे. सदर शिस्तीचे पालन न करणे ही बाब गैर वर्तणूक या सदरात अंतर्भूत होत असल्याने सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

1. विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख व इतर अधिकाऱ्यांनी निम्न स्वाक्षरीतांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडू नये. तसेच नैमित्तिक व इतर रजा ही मंजूर करून घेणे आवश्यक आहे.

2. वैद्यकीय रजेच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मध्ये विहित केलेले प्रमाणपत्रे नमुना तीन, नमुना चार व नमुना पाच मध्ये देणे आवश्यक आहे.

3. कर्मचाऱ्यांचे वेतन्य बायोमेट्रिकप्रमाणे वरील उपस्थितीची संलग्नित करून आहारांवर संवितरण होईल याची दक्षता घ्यावयाची आहे. रजा मंजुरी शिवाय वेतन आहारीत होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.

4. तीन पेक्षा जास्त वेळा विलंबाने येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत नैमित्तिक आदरणीय रजा खर्ची घालविण्याची कार्यवाही करावयाची आहे. सातत्याने विलंबना येण्याची सवय असल्यास त्या प्रकरणी विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करावयाची आहे. यासाठी दरमहा विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी आढावा घेणे आवश्यक आहे.

5. नैमित्तिक रजा या वर्षाकाठी आठ असल्याने त्या समप्रमाणात वापरले जातील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. 2/3 दिवसाच्या अर्जित रजा अपवादात्मक परिस्थिती शिवाय मंजूर होत नसल्याकडे लक्ष देण्यात यावे.

6. अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयीन कामानिमित्त कार्यालय सोडावयाचे असल्यास वरिष्ठांची परवानगी घ्यावी. तसेच विभागात हालचाल रजिस्टर मध्ये याची नोंद करावी. यामध्ये कार्यालय सोडल्याची व कार्यालयात परत आल्याची वेळ नमूद करावी.

7. कार्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या महापुरुष जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण यांना कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. संबंधित विभागाकडून आयोजित कार्यक्रमात असणारी अनुपस्थिती यापुढे गैरवर्तन समजले जाईल याची नोंद घ्यावी.

8. बैठका चालू असताना प्रसंगी कार्यालयीन वेळेनंतरही बैठक सुरू असली तरी सर्व अधिकारी यांनी कर्मचारी यांनी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. याशिवाय महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशन या कालखंडातही विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी शासन निर्देशानुसार ज्यादा वेळ कार्यालयात थांबणे रजा न घेणे हे औचित्य सांभाळायची आहेत.

9. अधिकारी आणि कर्मचारी यांनी ओळखपत्र नियमित बाळगावी.

10. या कार्यालयाचे परिपत्रक रचना व कार्यपद्धती सहा गटा पद्धत व कार्यालयीन स्वच्छता व कार्यालयीन गोपनीयता याबाबत नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

11. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वातंत्र ही ऑफिस प्रणालीचा वापर करावा तसेच आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकारी ऑफिस प्रणालीचा वापर करण्याचे सूचित करावे.

12. न्यायप्रविष्ट प्रकरणी विधी विभागाने सर्व विभागाचे लक्ष वेधून विभाग प्रमुखांनी विविध सोबत चर्चा करून प्रकरणी निकाली निघतील असे पाहावे.

13. सर्व विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी यांनी त्यांची प्रकरणे प्रशासनाकडे पाठविताना शासन नियमाने स्वयं स्पष्ट अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे. आदिनाथ अधिकारी कर्मचारी यांनी थेट प्रशासनाकडे कोणतीही मागणी करू नये याकडे लक्ष वेदावे.


उपरिक सूचनांची नोंद घ्यावी यापुढे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचे निदर्शनास आल्यास अधिकारी कर्मचारी यांची गैरवर्तवणूक समजून प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल तसेच वार्षिक मूल्यमापन लिहिताना या बाबीचा पडताळणी होईल याची नोंद घ्यावी.

आरोग्यसेवा आयुक्तालयाची शिस्तीचे पालन करण्याबाबतचे परिपत्रक

आरोग्यसेवा आयुक्तालयाची शिस्तीचे पालन करण्याबाबतचे परिपत्रक


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying