जागतिक दृष्टी दिन - Word sight day
दरवर्षी महाराष्ट्र राज्य तसेच संपूर्ण भारतभरात सन 2000 पासून जागतिक दृष्टी दिन ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. जागतिक अंधत्व व निवारण संस्थेमार्फत जागतिक दृष्टी दिनानिमित्त यावर्षी 13 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येत आहे या वर्षी Loves your eyes प्रेमाने घेऊ या आपल्या डोळ्याची काळजी व निगा हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
जागतिक दृष्टी दिन या दिनाचे विशेष साधून डोळ्याच्या आरोग्याविषयीचे माहिती तसेच मार्गदर्शन केले जाते.
• जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाबाबत तसेच डोळ्याच्या आरोग्याविषयी आजाराविषयी आणि उपचाराविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाविषयी आणि डोळ्याच्या आरोग्याविषयी अधिक माहिती प्रसारित होईल आणि त्यामुळे भविष्यात येणाऱ्या डोळ्याच्या अडचणी त्यांना व्यवस्थित रित्या सांभाळता येतील.
• डोळ्यांची काळजी व निगा कशी राखावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी डोळ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येते तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी किंवा नेत्र शल्य चिकित्सक हे शाळेमध्ये जाऊन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे डोळ्याची तपासणी करतात व त्रास असलेल्या विद्यार्थ्याला किंवा कमी दिसत असलेल्या विद्यार्थ्याला चष्म्याचा नंबर दिला जातो जर काही विद्यार्थ्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर शासनाच्या सुविधे मधून त्याला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.
• शालेय विद्यार्थ्यांमध्ये साधारणतः जास्त प्रमाणात आढळून येणारे अंधत्व म्हणजे दृष्टीदोष. दृष्टीदोष हा आजार आपण चष्म्याचा नंबर वापरून शालेय विद्यार्थ्यांची नजर व्यवस्थित करू शकतो त्यामुळे दिसाया दिसायला स्पष्ट होते. दृष्टीदोष या आजाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही जर याकडे दुर्लक्ष झाला तर त्यामुळे डोळ्याला मोठे परिणाम सुद्धा होऊ शकतात जसे की खूप दिवसापासून डोळ्याला नंबर आहेत दिसायला अंधुक आहे परंतु रुग्णांनी किंवा शालेय विद्यार्थ्यांनी जर चष्मा लावला नाही तर त्यामुळे रुग्णाला आळशी डोळा होऊन नेहमीसाठी अंधत्व येते, त्यासोबतच डोळ्याला तिरळेपणा होतो.
• जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येतात यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात येते आणि त्यासोबतच उपस्थित सर्व रुग्णांना डोळ्याची काळजी व निगा घेण्याबाबत जनजागृती करण्यात येते.
• स्थानिक केबल नेटवर्कद्वारे डोळ्याची काळजी यावर चर्चासत्र आयोजित केले जातात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत डोळ्यांच्या आजाराविषयी आणि उपचाराविषयी माहिती पसरली जाते आणि त्यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.