डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्याचा एक गंभीर आजार

डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्याचा एक गंभीर आजार | डायबेटिक रेटिनोपॅथी निदान उपचार आणि तपासणी | अत्याधुनिक उपकरणाद्वारे डायबेटिक रेटिनोपॅथी या आजाराचे निदान | डायबेटिक रेटिनोपॅथी असलेल्या रुग्णांनी कसे काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती | रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे होणारे डोळ्याचे आजार 

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetes Retinopathy) डोळ्याचा एक गंभीर आजार

डोळा हा आत्म्याचा आरसा समजला जातो. बरेच समज आणि भाव डोळ्याद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. आपण आनंदी आहोत की दुखी, भयभीत आहोत का रागावलेले. हे आपले डोळे समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतात. अशा या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियाला मोतीबिंदू, काचबिंदू, आळशी डोळा, तिरळेपणा, बुबुळाचे आजार इत्यादी कारणामुळे अंधत्व येण्याची चिंता असते.

 

डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्याचा एक गंभीर आजार


त्यातच सध्या मधुमेही व उच्च रक्तदाब यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी  हा आजार अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे. यामुळे डोळ्यासाठी डोळ्यासमोर गंभीर स्वरूप धारण होत आहे.

मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात न ठेवल्यास डोळ्यातील रेटिनाच्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यामधून रक्तस्त्राव होऊन रेटिनाच्या पेशींना प्रोटीन्स व ऑक्सिजन सारखे घटक मिळत नाहीत. परिणामी रेटिनाला सूज पण येऊ शकते व रेटिनाचा काही भाग निकामी पण होऊ शकतो यामुळे प्रामुख्याने अंधत्व येण्याची जास्त शक्यता निर्माण होते.

या सर्व गुंतागुंतीच्या समस्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणून गणल्या जाते हे दृष्ट चक्र दुर्लक्षामुळे असेच चालू राहिले तर कालांतराने रेटिनावर ताण पडून डोळ्याकडून मेंदूकडे दृष्टीचे संवेदना वाहून येणारी जी दृष्टीचेता नावाची नस असते ती पण निकामी बनवून कायमस्वरूपी अंधत्वाला सामोरे जावे लागते.

मानवी शरीरातील स्वादुपिंडा तयार होणारे एक विशिष्ट प्रकारचे संप्रेरक कमी प्रमाणात तयार झाल्यास त्यामुळे रक्तातील साखरेचे योग्य प्रमाणात विघटन होऊ शकत नाही त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतच जाते.

रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक काळापर्यंत वाढलेले असणे व मधुमेहाच्या योग्य औषध उपचाराकडे दुर्लक्ष करणे हे मधुमेहाला कवटाळणे होय.

दृष्टीसमोर काळे स्पॉट तरंगणे, डोळ्यांना अस्पष्ट किंवा दुसर दिसणे, दृष्टी कमजोर होणे रात्रीच्या वेळी बघण्यात अडथळा निर्माण होणे अशा प्रकारची लक्षणे डायबिटीस रिटर्नोपॅथी ह्या आजारांमध्ये दिसून येतात.

मधुमेह असलेल्या लाखो लोकांसाठी विकारापूर्वीच नेत्र तपासणी वेळेवर होणे महत्त्वाचे असते.

मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या रेटिनावरील रक्तस्त्राव दूर करण्याकरिता photocoagulation या लेझर सर्जरी द्वारा किंवा Cortico steroid इंजेक्शन देऊन उपचार केले जातात.

याशिवाय मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी रेटिना वरील सूज कमी करण्यासाठी औषधोपचार योजले जातात.  मधुमेहाचा इतिहास व लक्षणे यावरून अँजिओग्राफी किंवा ऑप्टिकल कोहेरेन्स तोमोग्रफी OCT या टेस्ट यावरून डायबेटिक रेटिनोपॅथी निदान केल्या जाते.

ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी वर्षभरातून किमान एकदा तरी नेत्रतज्ञ कडून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे उत्तमच आहे.


संतुलित जीवनसत्व युक्त योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब व मधुमेहावरील नियमित योग्य औषध प्रचार, अल्कोहोल, तंबाखू, स्मोकिंग यासारख्या व्यसनापासून कोसो दूर अशी ही जीवनशैली डायबेटिक रेटिनोपॅथी आजाराला आळा घालण्यासाठी उत्तम ठरते.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying