Cataract Surgery Guidelines Center Govt - मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शक सूचना (केंद्र शासन) | राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिनता नियंत्रण कार्यक्रम
1. नेत्र शस्त्रक्रिया या स्वतंत्र नेत्र शस्त्रक्रिया गृह मध्येच करण्यात याव्यात.
2. शिबिरामध्ये फक्त रुग्णाची तपासणी करून त्यांना शस्त्रक्रिये करिता मूळ शस्त्रक्रिया गृह असणाऱ्या रुग्णालयात आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
3. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व शासकीय संस्था व खाजगी रुग्णालय यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करारनामा करणे आवश्यक आहे.
4. कोणत्याही परिस्थितीत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया किरकोळ बाब म्हणून करण्यात येऊ नये, जीवन साधेपणाने जगण्यासाठी दृष्टी ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे सामान्य दृष्टी प्राप्त होण्यासाठी नेत्र शस्त्रक्रियेत यश मिळविणे खूप आवश्यक आहे.
5. ज्या अशासकीय स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत आहेत अशा संस्थांना नेत्र तपासणी शिबिरे घेण्याकरिता त्यांचा पूर्व इतिहास व सर्जरीच्या शहानिशा केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात यावी. सदर संस्थेने शिबिरापूर्वी किमान दोन आठवडे अगोदर परवानगी मागावी. ज्या स्वयंसेवी संस्था नेत्र शस्त्रक्रिया करतात परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही अशा संस्थेवर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे.
6. केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या नेत्र शस्त्रक्रिया गृहाबाबत व इतर सूचना लक्षात घेऊन अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी प्रस्तावित केलेले नेत्र शस्त्रक्रिया गृह व त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे मूल्यांकन केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्याकडून नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यास परवानगी देण्यात यावी.
7. ज्या रुग्णालयाकडे नेत्र सेवा सोबत पायाभूत सुविधा आहेत जसे की
• अंत रुग्ण विभागांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड्स व स्वातंत्र किंवा एकत्र नेत्र शस्त्रक्रिया गृह आहे.
• नेत्र शस्त्रक्रिया गृह नियमितपणे चालू स्थितीत आहे.
• शासकीय व अशासकीय स्वयंसेवी संस्था मधील दोन्ही नेत्र शस्त्रक्रिया गृह नेहमी योग्य निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येत आहेत अशा रुग्णालयांना शिबिरे आयोजित करण्याकरिता परवानगी देण्यात यावी.
• ज्या रुग्णालयात शिफ्ट ओटी आहे किंवा सात दिवसापेक्षा जास्त दिवस शस्त्रक्रिया गृह बंद आहे अशा ठिकाणी नेत्र शिबिरे घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
8. शस्त्रक्रिया चमूमध्ये आवश्यक अनुभव असलेले दोन नेत्रशल्य चिकित्सक, दोन स्टाफ नर्स, एक नेत्र चिकित्सा अधिकारी व एक शस्त्रक्रिया गृह सहाय्यक असणे आवश्यक आहे.
9. शस्त्रक्रिया चमू मधील एक नेत्र शल्य चिकित्सक यांना शासकीय किंवा अशासकीय क्षेत्रात किमान पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असावा किंवा नेत्र शास्त्र विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा घेतल्यानंतर किमान 500 शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र असावे. दुसरे नेत्र शल्य चिकित्सक हे पदव्युत्तर पदवी diploma in ophthalmology प्राप्त असावे कोणत्याही परिस्थितीत त्या नेत्र चिकित्सकाने मुख्य नेत्र चिकित्सकांच्या देखरेखी खालील काम करणे आवश्यक आहे.
10. मोतीबिंदू किंवा काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांची योग्यता पाहण्यासाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.
11. मोतीबिंदू किंवा काचबिंदू शस्त्रक्रिया करिता निवडण्यात आलेल्या रुग्णांना प्रतिजैविके आय ड्रॉप वारंवार डोळ्यात घालण्यासाठी देण्यात यावे तसेच डायमॉक्स सारख्या गोळ्या देण्यात याव्यात.
12. शस्त्रक्रिया शिबिरामध्ये मुख्य नेत्र शल्य चिकित्सकाकडून एका दिवशी 20 ते 30 नेत्र शस्त्रक्रियेपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात येऊ नयेत.
13. नेत्र शस्त्रक्रियेसाठी चांगल्या दर्जाचा व सुस्थितीत असलेला मायक्रोस्कोप वापरण्यात यावा तसेच प्रत्येक नेत्र शल्य चिकित्सकाला वेगळा मायक्रोस्कोप असावा. सर्व मोतीबिंदू शस्त्रक्रिया चा मुख्य उद्देश आय ओ एल चे व्यवस्थितपणे रोपण करणे हा आहे. दुसऱ्या नेत्र शल्य चिकित्सकाने सावकाशपणे नेत्र शस्त्रक्रिया करावी त्यामध्ये घाई करू नये.
14. नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे निर्जंतुकीकरण करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. नेत्र शस्त्रक्रिया गृहातील साहित्य जसे की मायक्रोस्कोप, सर्जिकल ट्रॉली, रुग्णांचे व शस्त्रक्रिया चमू कडून वापरण्यात येणारे कपडे, शस्त्रक्रिये करिता वापरण्यात येणारी सर्व साहित्य सामग्री व आयओएल इत्यादीचे निर्जंतुक असल्याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत कमी दर्जाचे निर्जंतुकीकरण साहित्य जसे की इंडस्ट्रियल स्पिरीट आणि ऍसिटोन वापरण्यात येऊ नये.
15. प्रत्येक रुग्णास वेगळे साहित्य वापरण्याकरिता शस्त्रक्रिया चमुने त्यांच्याकडे सर्जरी सेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करावी त्यामुळे पूर्ण दिवसभरात योग्य निर्जंतुकीकरण होत असल्याची खात्री मिळते.
16. शस्त्रक्रिया पूर्व शिबिरामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्य समुग्रीची पुरवठा कंपनी मुदत समाप्ती पॅकिंग व स्वच्छता इत्यादीची तपासणी करणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया मध्ये वापरण्यात येणाऱ्या नॉर्मल सलाईन बॉटल हलवून त्यामध्ये काही अशुद्धता आहे का हे पाहण्यासाठी अचूक निरीक्षण करणे गरजेचे आहे.
17. मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेहमी रुग्णालयातील ओटी मध्ये आवश्यक निर्जंतुकीकरणाची काळजी घेऊन करण्यात याव्यात.
18. नेत्र शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्यावर योग्य पद्धतीने पट्टी बांधणे आवश्यक आहे.
19. नेत्र शस्त्रक्रिया पश्चात होणारे संसर्ग व इतर गुंतागुंत टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णास नेत्र शस्त्रक्रिया पश्चात देण्यात येणारे योग्य उपचार करण्यात यावेत.
20. नेत्रशल्यचिकित्सकाने त्यांच्या चम्मू सोबत प्रत्येक रुग्णाचे नेत्र शस्त्रक्रिये पश्चात पहिल्या तिसऱ्या व सातव्या दिवशी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे
21. पूर्ण दृष्टी परत मिळविण्याकरिता भविष्यात पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
22. मोतीबिंदू शस्त्रक्रिया रेकॉर्डमध्ये प्रत्येक रुग्णाचे फोटो ओळखपत्र पत्ता संपर्क क्रमांक मध्ये नमूद करून जतन करण्यात यावा जेणेकरून गरज असल्यास लवकर संपर्क करणे सोपे होईल.