आनंदाची बातमी : राज्यातील आणखीण या संवर्गातील पदांना लागु होणार सुधारित वेतनश्रेणी
राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले बक्षी समिती खंड – 2 अहवालानुसार सुधारित वेतनश्रेणी बाबत राज्यातील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहेत . यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्याचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे .बक्षी समिती खंड – 2 अहवालांमध्ये काही विशिष्ट पदांचाच विचार केला गेला असल्याने कर्मचाऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहेत .
राज्यातील प्राथमिक शिक्षकांना उच्च वेतनश्रेणीमध्ये वाढ करणेबाबत उच्च न्यायालयाने निकाल देवूनही बक्षी समिती खंड -2 मध्ये सुधारित वेतनश्रेणी लागु न केल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील लिपिक संवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे . कारण लिपिक संवर्गाचा बक्षी समिती खंड – 2 मध्ये कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही .
तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांना मानधन न देता वेतन देण्यात यावे , अशा प्ररमुख मागणीकरीता आंदोलन सुरु आहेत .कारण अंगणवाडी सेविका / मदतनिस ह्या राज्य शासनाच्या अर्धवेळ कर्मचारी असून पुर्ण वेळ काम करुन घेतात शिवाय इतरही कामे राज्य शासनाकडून लावण्यात येतात . यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन न देता वेतन देण्यात यावे . अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे .
तसेच इतर अनेक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी बक्षी – समिती खंड 2 मध्ये त्रुटी दुर झालेले नाहीत . अशा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दुर करण्याकरीता राज्य शासनाकडून पुन्हा एकदा सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत .कारण काही संवर्गातील पदांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करणेबाबतच्या शिफारशीस सहमती दर्शविण्यात आलेली होती .सदर शिफारशींचा अभ्यास सध्या राज्य शासनाकडून सुरु आहे .
यामध्ये गृह विभाग , शालेय शिक्षण विभाग , उच्च व तंत्रज्ञान विभाग तसेच जिल्हा परिषदेमधील काही संवर्गातील पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबच्या शिफारशीस राज्य शासनाने सहमती दर्शविली होती .अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहे .त्याचबरोबर ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुट्या आढळूनही त्रुटी दुर झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांकडून सादर करण्यात आलेले निवेदन घेण्यात आलेले आहेत .
अधिक माहितीसाठी खालील साईट बघावी.
https://live.marathisanhita.com/2023/02/good-news-sudharit-vetanshreni-state-employee/