Retinoblastoma म्हणजे काय त्याची लक्षणे आणि उपचार ?

World Retinoblastoma Weak 15 May to 21 May

Retinoblastoma हा एक डोळ्याचा गंभीर आजार असून याला आपण डोळ्याचा कर्करोग असेही म्हणतो. या आजाराविषयी समाजामध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये याची माहिती व्हावी यासाठी 15 मे ते 21 मे या कालावधीमध्ये हा आठवडा world Retinoblastoma Weak म्हणून साजरा केला जातो. या आजाराविषयी समाजामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये जनजागृती नसल्यामुळे सुरुवातीला याच्याकडे दुर्लक्ष केले जायचे परंतु आता जनजागृती झाल्यामुळे पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाच्या डोळ्याचे निदान करता येते. लवकर निदान झाल्यामुळे त्यावरील उपचार यशस्वीरित्या करणे शक्य झाले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण डोळ्याच्या कर्करोगा विषयीची थोडक्यात माहिती बघुयात...

World Retinoblastoma Weak 15 May to 21 May


Retinoblastoma म्हणजे काय ?

Retinoblastoma हा एक डोळ्याचा आजार असून मुख्यतः लहान मुलांमध्ये पहिल्या सहा महिन्यापासून ते तीन वर्षाच्या आत मध्ये या आजाराचे निदान करता येते यालाच आपण डोळ्याचा कर्करोग असेही म्हणतो. या आजारामध्ये डोळ्याची वाढ होत असताना दृष्टीपटल मधील काही पेशीची वाढ साधारणपणे न झाल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

Retinoblastoma हा एक आनुवंशिक आजार आहे तसेच या आजारामुळे वीस हजारातील एक बालक ग्रासलेली असू शकते.

Retinoblastoma का होतो ?

Retinoblastoma होण्याची कारण म्हणजे हा आजार एक अनुवंशिक आहे ज्याच्या कुटुंबामध्ये पहिला हा आजार झालेला असेल अशा कुटुंबातील व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

हा आजार अनुवंशिक असल्यामुळे सुरुवातीच्या सहा महिन्यातच त्याची लक्षणे दिसायला लागतात.

गुणसूत्रातील दोषामुळे ही हा आजार होऊ शकतो.

Retinoblastoma लक्षणे कोणती ?

डोळ्याचा कर्करोग आणि त्याची लक्षणे खालील प्रमाणे आहेत. डोळ्याच्या कर्करोगाची लक्षणे हे सहा महिन्यानंतर दिसायला सुरू होतात..

1. लहान मुलांमध्ये डोळ्याच्या बाहुलीचा कलर पांढरा किंवा पिवळट दिसणे हे खुप साधारण आढळून येणार लक्षण आहे. नॉर्मल बाहुलीचा कलर हा काळसर असतो परंतु या आजारामध्ये बाहुलीचा कलर पांढरा पिवळट होतो. या लक्षणाला विज्ञानाच्या भाषेत Leucocoria से ही म्हणतात.

2. डोळ्याला दिसायला कमी असते.

3. डोळ्यांमध्ये तिरळेपणा होतो.

4. Retinoblastoma हजार एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये ही होऊ शकतो.

5. डोळ्यावर सूज येणे तसेच डोळे लालसर होणे


Retinoblastoma या आजाराचे निदान कसे करतात ?

जन्मलेल्या बाळांची नेत्र तपासणी करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये जर सुरुवातीला बाळाच्या डोळ्यांमध्ये बाहुलीचा कलर पांढरा व पिवळा दिसत असेल तर अशा बाळांची Retinoblastoma ची तपासणी करावी.


Retinoblastoma चे उपचार 

डोळ्याचा कर्करोग असलेल्या बाळांची तपासणी जर लवकरात लवकर झाली आणि त्याचे निदान जर लवकरात लवकर झाले तर त्या बाळाची दृष्टी परत मिळवता तसेच त्यामुळे होणारे गुंतागुंती पासून बचाव करता येतो.

लवकर निदान झालेल्या बाळावर उपचार करणे हे सोयीचे आणि यशस्वी रित्या करता येते.

डोळ्याच्या कर्करोगावर उपचार म्हणजे केमोथेरपी, रेडिओथेरपी, ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे डोळे आणि दृष्टी वाचविण्याचं प्रमाण वाढलं आहे.


Retinoblastoma हा एक गंभीर आजार आहे यामध्ये जर लवकरात लवकर निदान नाही झाले तर त्यामुळे कर्करोगाची गाठ वाढत जाते आणि त्यामुळे डोळ्याला काचबिंदू होऊन डोळ्याची पूर्णपणे नजर कमी होते. आणि अंततः डोळा काढण्याची गरज पडते. त्यामुळे या घराचे लवकरात लवकर निदान झाले तर त्यामुळे आपण डोळ्याची नजर तसेच रुग्णांचा जीवही वाचू शकतो.

जागतिक डोळ्याचा कर्करोग आठवडा साजरा करण्यामागे हाच उद्देश आहे की या आजाराविषयी ची माहिती सर्व समाजामध्ये व्हावी आणि लहान मुलांमध्ये होणाऱ्या या गंभीर आजाराचे निदान लवकरात लवकर व्हावे व त्यामुळे त्यांची डोळ्यांची नजर वाचवण्यास मदत व्हावी.


ज्ञानेश्वर भगवान पोटफोडे

 नेत्रचिकित्सा अधिकारी 




Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying