डॉ भालचंद्र स्मृतिदिन सप्ताह
डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह 10 ते 16 जून 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भारतात अंधत्व दूर करण्यासाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सन 1976 पासून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा जन्म 10 जून 1926 रोजी झाला. ते प्रख्यात नेत्र शल्य विशारद होते. त्यांनी त्यांच्या कालावधीत दहा हजार यशस्वी मोतीबिंदू शत्रक्रिया केल्या. त्यांचा मृत्यू 10 जून 1979 रोजी झाला. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.