जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षिणता कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी जून महिन्यात डॉ. भालचंद्र यांच्या जन्मानिमित्त जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्य जनतेमध्ये विविध नेत्र आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व उपचार याबाबत जनजागृती केली जाते तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, खुपर्या, डायबेटिक रेट्रोपॅथी लहान मुलांमध्ये नेत्र विकार इत्यादी नेत्रविकारांचा प्रतिबंध निदान आणि व्यवस्थापन करणे हा असतो.
जगातील एकूण नेत्रही व्यक्तींपैकी 20 टक्के नेत्रही भारतात असून त्यातील 30 लाख नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते ज्यांची नेत्र बुब्बुल निकामी झाली आहेत परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. त्याला सर्वसाधारणपणे आपण नेत्ररोपण म्हणतो. मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळेच नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.
नेत्रदान फारच सोपे असून त्यासाठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे बघुयात
1. नेत्रदान धार्मिक बंधन नाही कुठलाही धर्म अशा महान कार्यास विरोध करत नाही.
2. जन्मजात बालकापासून अगदी शंभर वर्षाच्या स्त्री-पुरुषा पर्यंत कोणाचेही नेत्रदान करू शकता.
3. कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात.
4. मृत व्यक्तीस एड्स, रेबीज, कावीळ, कर्करोग, सिफिलिस, धनुर्वात आणि विषाणूपासून होणारे रोग असल्यास अशा व्यक्तींची नेत्ररोपणासाठी निरोपयोगी ठरतात परंतु ही नेत्र बुबुळे संशोधनासाठी वापरतात.
5. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे म्हणजेच नेत्र बुबुळ चांगल्या स्थितीत असल्यास घरच्यांच्या परवानगीने वेळेवरही नेत्रदान होऊ शकते.
6. ज्यांचे नेत्र बुबळे चांगले आहेत परंतु इतर काही दोषामुळे अंधत्व आले आहे अशा नेत्राचे नेत्रदान होऊ शकते.
7. मृत्यूनंतर लवकरात लवकर पाच ते सहा तासापर्यंत नेत्रदान होणे आवश्यक असते. नेत्रदानासाठी जवळच्या नेत्रातील संकलन केंद्र किंवा नेत्र पिढीचे प्रतिज्ञापत्र भरून घ्यावे त्यातून आपली इच्छा लेखी स्वरूपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना वारसांना माहीत होते. आपली इच्छा जवळच्या नातेवाईकांना, शेजारी, मित्र-मैत्रिणींनाही आवर्जून सांगावी.