अध्ययन रजेचे अधिकार
आज दिनांक 7 जून 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे शासनाकडे असलेले अध्ययन रजेचे अधिकार आता आरोग्य विभागाचे आयुक्त यांना मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यासंबंधीचा शासन निर्णय.
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थातील गट-क व ड संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या अध्ययन रजेच्या मंजुरीचे अधिकार आरोग्य सेवा आयुक्त यांना देण्यात आले आहेत.
खालील प्रमाणे शासन आदेश -
उपरोक्त संदर्भ क्र. १ मध्ये नमूद अधिसूचनेनुसार आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट- क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलेले आहे .
२. आता, या शासन आदेशानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व ड च्या कर्मचाऱ्यांना विहित नियमांनुसार संबंधित कर्मचारी अध्ययन रजेसाठी पात्र असल्यास अध्ययन रजा मंजूरीचे अधिकार विभाग प्रमुख म्हणून आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांना प्रदान करण्यात येत आहेत.
३. अध्ययन रजा मंजूर करताना संबंधीत कर्मचाऱ्यांचे यापूर्वी सेवांतर्गत प्रशिक्षण हे प्रतिनियुक्ती संबोधून दिले असले तरी असा प्रतिनियुक्ती दर्शविलेल्या प्रशिक्षण कालावधी हा अध्ययन रजा म्हणून परिगणीत करण्यात यावा व अशा प्रकरणात मर्यादेतच उर्वरीत अध्ययन रजा अनुज्ञेय असल्यास मंजूर करण्यात यावी. तसेच या शासन आदेशाच्या दिनांकानंतर कोणतेही नवीन अध्ययन रजा मंजूरीचे प्रस्ताव उपरोक्तनुसार आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांचेस्तरावरून निकाली काढण्यात यावे.
शासन निर्णयाचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या डाउनलोड शासन निर्णय या बटन वरती क्लिक करावे.