४० टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना ७५ टक्के सवलत अनुज्ञेय

गृह विभाग शासन निर्णय क्र. एसटीसी- १०१७ /प्र.क्र.५२५/परि-१ /दिनांक ०९.१०.२०१८ अन्वये ४० टक्के तसेच त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना रा.प. महामंडळाच्या साध्या तसेच निमआराम बसेसमध्ये ७५ टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांच्या साथीदारास ५० टक्के प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत /अंध-अपंग / ४७३०, दिनांक १२.१०.२०१८ अन्वये सर्व विभागीय कार्यालयांस परिपत्रकीय सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

४० टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना ७५ टक्के सवलत अनुज्ञेय


वाहतूक खाते परिपत्रक क्र.४/२०१९, पत्र क्र. राप / वाह / सवलत / १२७३, दिनांक ०५.०३.२०१९ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांस व त्यांचे साथीदारास शिवशाही [आसनी] बसेसमध्ये अनुक्रमे ७० टक्के व ४५ टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली.

अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र व अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु सदरचे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र प्रवासादरम्यान सवलतीकरीता ग्राहय धरण्यात येत नसल्याचे तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत. सदर तक्रारींच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्रांद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीकरीता केंद्र शासनाद्वारे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र ग्राहय धरण्याबाबत विभागीय कार्यालयांस कळविण्यात आले आहे.

परंतु अद्यापही काही लाभार्थ्यांस मुळ दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (UDID) प्राप्त झाले नसल्याने सदर लाभार्थ्यांकडून शासनाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घेतलेले रंगीत झेरॉक्स प्रत रा. प. प्रवासामध्ये सवलत मिळणेकरीता ग्राहय धरणेबाबतची निवेदने या कार्यालयास प्राप्त होत आहेत.

सदर तक्रारींच्या अनुषंगाने सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांचे वरील संदर्भिय पत्राद्वारे दिव्यांग लाभार्थ्यास वैश्विक ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र यांच्या मुळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजी लॉकर प्रणालीवरील प्रतीवर रा. प. प्रवासात सवलत अनुज्ञेय करण्याबाबत कळविले आहे.

तरी आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच वाहक यांना दिव्यांग लाभार्थ्यांस वैश्विक ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र यांच्या मुळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजी लॉकर प्रणालीवरील प्रतीवर रा. प. प्रवासात सवलत अनुज्ञेय करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. याबाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सदरची बाब अत्यंत महत्वाची समजून कार्यवाही करण्यात यावी.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying