आयुष्यमान भव मोहीम म्हणजे काय ?

आयुष्यमान भव मोहीम म्हणजे काय ?

आयुष्यमान भव ही केंद्र शासनाची मोहीम असून या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशांमध्ये तसेच राज्यांमध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये विशेषतः लहान मुलांची आणि वयस्कर व्यक्तींची तपासणी ही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येणार आहे. 

आयुष्यमान भव ही मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी केंद्राने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या मोहिमेची जबाबदारी दिलेली आहे. 


आयुष्यमान भव मोहीम म्हणजे काय ?


आयुष्यमान भव ही मोहीम का सुरू करण्यात आलेली आहे ?

आयुष्यमान भव ही मोहीम सुरू करण्याचा उद्देश म्हणजे देशातील सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी व्हायला हवी, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी व्हायला हवी, तसेच वेगवेगळ्या आजारांचे लवकरात लवकर निदान व्हावे आणि त्यावर उपाय आणि उपाययोजना करणे सोयीचे व्हावे त्यामुळे लवकर निदान करण्यासाठी या मोहिमेचा फायदा होणार आहे.

आयुष्यमान भव या मोहिमेमध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जाऊ शकतात ?

आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंतच्या होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचे निदान आणि उपचार केले जाणार आहेत.

तसेच काही आजारावर जिल्हास्तरावर होणाऱ्या शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जाणार आहेत.

यामध्ये साधारणतः डोळ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे तसेच डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारावर उपाय योजना केले जाणार आहेत, कान नाक घसा आजारांची तपासणी केली जाणार आहे, डेंटल ची तपासणी केली जाणार आहे.

वेगवेगळ्या आजाराविषयी रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच समुपदेशन केले जाणार आहे.

आयुष्यमान भव मोहीम मार्गदर्शक सूचना

आयुष्यमान भव या मोहिमेसाठी केंद्राने ठरविलेल्या मार्गदर्शन सूचना बघणार आहोत

केंद्र शासनाचा अत्यंत महत्वांकाक्षी “आयुष्मान भव" मोहिम सर्व जिल्हयांमध्ये दि.०१ सप्टेंबर २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविणेबाबत मार्गदर्शक सुचना केंद्र शासनामार्फत प्राप्त झाल्या आहेत. या मोहिमे अंतर्गत विविध आरोग्य संबंधित योजनांचा समावेश जन सामान्यासाठी करण्यात आलेला आहे. सदर मोहिमे दरम्यान खालील उपक्रम विशेष मोहिम म्हणून राबविण्यात यावेत.

१) आयुष्मान आपल्यादारी ३.०

२) आयुष्मान सभा

३) आयुष्मान मेळावा

४) अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी


१) आयुष्मान आपल्यादारी ३.० -

आयुष्मान आपल्यादारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने या उपक्रमांतर्गत सर्व जिल्हयांमधील पात्र लाभार्थ्याची नोंदणी करुन आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात यावे. सदर उपक्रमाचा लाभ सर्व सामान्यापर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी.


२) आयुष्मान सभा -

सदर उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व VHSNC यांच्या मार्फत राबविण्यात येतो. सदर मोहिमेचे मुळ उद्दीष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इ. बाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर मिळणा-या सेवा सुविधांचे मुल्यकापन करणे. सदर सभेद्वारे खालील उपक्रम राबविण्यात यावेत -

• आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात यावे.

• प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात यावी.

• प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात यावी. 

• प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत संलग्न रुग्णालयांची यादी प्रसिध्द करण्यात यावी.

• असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती व लाभार्थ्यांचे अनुभवांची देवाण घेवाण करावी.


३) आयुष्मान मेळावा -

अ) आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवडयातील शनिवार किंवा रविवार खालील दिलेल्या थीमनुसार उपक्रम प्राधान्याने राबविण्यात यावेत.

Week specific main themes

Week 1: NCD screening (Diabetes, Hypertension, Cancers- Oral, Cervical & Breast)

Week 2: Tuberculosis, Leprosy And Other Communicable Diseases

Week 3: Maternal and Child health, Nutrition and Immunization

Week 4: Ophthalmic Screening And Eye Care Services

(Tribal areas - Sickle Cell Disease Screening)

सदर मेळाव्या दरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे. सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात याव्यात.

ब) Community Health Centre स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत आरोग्य मेळाव्याचे आयोजन-

या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व Community Health Centre स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत आठवडयाला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. याकरीता आपल्या मार्फत वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता यांना याबाबत पत्र देण्यात यावे. या अंतर्गत खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत

• तज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात यावेत.

ज्या तालुक्यामध्ये तज्ञ सेवांचा आभाव आहे त्या तालुक्यामध्ये रुग्णांना तज्ञ सेवांचा लाभ देण्यात यावा.

४) अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी -

या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (०-१८ वयोगट) विशेष मोहिम राबवून आरोग्य तपासणी करण्यात यावी. या अंतर्गत खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत -

०- १८ वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यात याव्या.

० - १८ वयोगटातील मुलांचे ४Ds (Defects at birth, Development Delays, Deficiencies and Diseases) करीता तपासणी करण्यात यावी.

३२ सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करावेत. तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरीता संदर्भित करण्यात यावे.

तसेच आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात यावी. (उदा. चष्मा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर )

वरील उपक्रमांसोबतच १ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात यावा. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व संस्थांचे स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying