Aarogya vibhag Bharti 2023 | important updates on group c and group d post
आरोग्य विभाग भरती 2023 | गट क आणि गट भरती बाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट आरोग्य विभागाच्या पोर्टल वरती प्रदर्शित केले आहे
आयुक्त आरोग्य सेवा, आरोग्य विभाग, मुंबई यांनी गट क आणि गट भरती बाबत महत्त्वाचे अपडेट आरोग्य विभागाच्या पोर्टल वरती प्रदर्शित केले आहे यामध्ये काय नमूद आहे याविषयीची माहिती आपण थोडक्यात बघूयात..
मित्रांनो ही माहिती पूर्ण वाचा यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दर्शविलेली आहे.
मित्रांनो आरोग्य विभागाने गट क आणि गट भरती बाबत जाहीर प्रगटन दिली आहे त्यामध्ये खालील प्रमाणे अतिशय महत्त्वाचे माहिती दिलेली आहे.
गट क आणि गट पदासाठी खालील प्रमाणे महत्त्वाची माहिती
१. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम व शैक्षणिक अर्हतेत कोणतेही बदल होणार नाही.
२. तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेशी संबंधित बाबी असतील.
३. माजी सैनिक उमेदवारांचे परीक्षा शुल्क परिक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल.
4. पॅरामेडीकल पदांसाठी आवश्यकतेनुसार नर्सिंग कौन्सिल, फार्मसी कौन्सिल, डेंन्टल कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक राहील. जर उमेदवारांकडे पॅरामेडिकल कौन्सिल, नर्सिंग कौन्सिल, फार्मसी कौन्सिल, डेंन्टल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास त्यांचे नियुक्तीपासून ६ महिन्यात सदर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
मित्रांनो यामध्ये मुद्दा क्रमांक चार या मध्ये जे विद्यार्थी तांत्रिक पदासाठी पात्र आहेत किंवा त्या पदासाठी आवेदन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन केलेले असायला हवे आणि नसेल केले तर त्वरित ऑनलाइन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे किंवा नोंदणी करावी.
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करण्यासाठी बराच कालावधी लागतो त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट कौन्सिल तपासणी करते आणि त्यानंतर तुम्हाला कौन्सिलचे प्रमाणपत्र देते.
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे ?
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयीची माहिती खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता.