आरोग्य विभागातील गट क व गट ड भरती परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन

आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 महत्त्वाची अपडेट

आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या घटका व गट संवर्गातील भरती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 18 9 2023 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता आरोग्य विभागाने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत जाहीर प्रगटन विभागाच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले आहे याविषयीची माहिती आपण थोडक्यात बघूया....

अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन


अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क व गट संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 29.08.2023 रोजी पासून उमेदवाराची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी दिनांक 18.09.2023 वाजून 23.55 वाजता पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क व गट संवर्गातील भरती कामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाइन शुल्क जमा करण्यासाठी पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्याबाबत जाहीर प्रकटन


यापूर्वी दिनांक 29.8.2023 ते 18.9.2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच वरील प्रमाणे मुदत वाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ करण्यात येणार नाही.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying