आयुष्यमान भव या मोहिमेअंतर्गत अवयव दान आणि नेत्रदान संबंधी पत्र कसे भरावे याविषयीची माहिती

आयुष्यमान भव मोहीम म्हणजे काय ?

आयुष्यमान भव ही केंद्र शासनाने दिनांक 17 सप्टेंबर 2023 पासून ते दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत आरोग्य सेवेचे बळकटीकरण तसेच जनमानसामध्ये आरोग्य सेवेची माहिती पसरावी, वेगवेगळ्या आजाराचे लवकरच निदान होऊन त्यावर उपचार करण्यात यावे यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.

आयुष्यमान भव या मोहिमेअंतर्गत अवयव दाना आणि नेत्रदान संबंधी पत्र कसे भरावे याविषयीची माहिती


Organ Donation pledge Certificate 

नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण केंद्र शासनाने सुरू केलेल्या आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत अवयव दान आणि नेत्रदान समती पत्र कसे भरावे याविषयीची माहिती आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.

मित्रांनो आपणा सर्वास माहीतच आहे की केंद्र शासनाने आता नवीन मोहीम हाती घेतलेली आहे तिचे नाव आहे आयुष्यमान भव मोहीम. या मोहिमेअंतर्गत केंद्र शासन संपूर्ण भारत देशामध्ये दिनांक 17 सप्टेंबर 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशातील सर्व आरोग्य सुविधा यांचे बळकटीकरण करणार आहे. आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत रुग्णांना वेगवेगळ्या आरोग्य सोयींचे आणि सुविधांचे फायदे या कालावधीमध्ये दिले जाणार आहे. यामध्ये रुग्णांच्या सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत मुख्यतः नेत्ररोग तपासणी कान नाक घसा तपासणी, रक्तदाब तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींची तपासणी अशा वेगवेगळ्या आजारावर या कालावधीमध्ये उपचार केले जाणार आहे.

त्याचबरोबर केंद्र शासनाने अवयव दान नेत्रदान आणि रक्तदान यावरती भर दिलेला आहे, आयुष्यमान भव या मोहिमेचे औचित्य साधून शासनाने जी व्यक्ती नेत्रदान अवयव दान करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींसाठी शासनाने नवे पोर्टल ओपन केले आहे त्यामध्ये आता व्यक्ती त्यांची माहिती ऑनलाईन फॉर्मेट मध्ये भरू शकतो. यापूर्वी आपणास जर नेत्रदान संबंधी पत्र भरायचे असल्यास व्यक्तीला सरकारी हॉस्पिटल किंवा एखाद्या एनजीओ मध्ये जाऊन ते भरावे लागत असे परंतु आता कोणीही घरबसल्या ऑनलाईन संबंधी पत्र भरू शकते.

नेत्रदान किंवा अवयव दान करण्यासाठी शासनाने जी ऑनलाईन पोर्टल ओपन केले आहे ते खालील दिलेल्या लिंक वरून ओपन करू शकता.

अवयव दान किंवा नेत्रदान संमती पत्र भरण्याकरिता क्लिक करावे

वरती दिलेल्या लिंक वरून तुम्ही नेत्रदानासाठी आणि अवयव दानासाठी संमती पत्र करू शकता यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे किंवा आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन संबंधी पत्र भरत असताना लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणे ही आवश्यक आहे कारण त्यावरती ओटीपी पाठवला जातो.

मित्रांनो ऑनलाईन संबंधी पत्र भरण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. त्यामुळे जे व्यक्ती नेत्रदान किंवा अवयव दान करण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींनी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ते त्यांची संबंधित पत्र भरून देऊ शकतात.

मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यमान भव मोहीम आणि नेत्रदान किंवा अवयव दान संबंधी पत्र कसे भरावी याविषयीची जास्त माहिती हवी असेल तर कृपया आपण जिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन अधिकची माहिती घेऊ शकता.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying