आकस्मित निगडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील अंतर रुग्ण उपचार २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी

शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित निगडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील अंतर रुग्ण उपचार

शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित निगडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील अंतर रुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीच्या मंजुरी बाबतचा हा शासन निर्णय...

शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 मधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मित उद्भवणाऱ्या सत्तावीस हजारावर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील वैद्यकीय खर्चाची वेतन गटानुसार ठरविण्यात आलेल्या टक्केवारीप्रमाणे परंतु प्रत्येक प्रकरणी रुपये 20000 च्या कमाल मर्यादेत प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना आहेत. या मर्यादे वरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीची प्रकरणे संबंधित मात्र मंत्रालयीन प्रशासकीय विभागामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभागाकडे विशेष बाब म्हणून मान्यते या दृष्टीने सादर केली जातात. सद्यस्थितीत औषधाच्या किमतीत व उपचार पद्धतीवर खर्चामध्ये झालेले वाढ तसेच अशी प्रकरणी निकाली काढण्यास लागणारा कालावधी इत्यादीचा विचार करता प्रचलित कमाल मर्यादित वाढ करणे व प्रतिपूर्तीच्या अनुदनीय रकमेची परिघना करण्यामध्ये सुलभता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय

खालील प्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे...

औषधोपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती:

वेतन गटानुसार औषध उपचारावरील कर्जाच्या प्रतिकृतीची अनुज्ञ रक्कम प्रस्तुत शासन निर्णयामधील तक्ता अ मध्ये नमूद केली आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन आता वेतनश्रेणीचे वर्गीकरण न करता औषधोपचार वरील प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के रक्कम सरसकट अनुज्ञेय राहील.

प्रतिपूर्तीच्या अनुदिनितीची कमाल मर्यादा व मंजुरीचे अधिकाराबाबत..

• महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अधीन राहून 40 हजार पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीचे अधिकार संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात येत आहेत.

• प्रचलित पद्धतीनुसार 20000 वरील वैद्यकीय खर्चाची प्रतिकृती एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याबाबतची प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभागात सादर होती आता रुपये चाळीस हजारांवरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रकरणांना महाराष्ट्र राज्य नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील तरतुदींच्या अधीन राहून मंजुरी देण्याची अथवा उचित निर्णय घेण्याची पूर्ण अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांना देण्यात येत आहेत.

• विहित तरतुदीत न बसणाऱ्या प्रकरणी काही अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीस मान्यता द्यावयाची असल्यास अशा प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पुढे नमूद केलेल्या समिती गठीत करण्यात येत असून या समितीकडे अशी प्रकरणे निर्णय सार्थ सादर करण्यात यावीत.

अ) अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग - अध्यक्ष

ब) सचिव वित्त विभाग - सदस्य

क) संबंधित प्रशासकीय विभागाचे सचिव- सदस्य

ड) महासंचालक आरोग्य सेवा मुंबई - सदस्य

ई) संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई - सदस्य

फ) उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग - सदस्य सचिव

शासन या द्वारे असे निदेश देत आहे की वर नमूद केल्याप्रमाणे विभाग प्रमुख व प्रशासकीय विभाग प्रमुख या स्तरावर प्रकरणांना मंजुरी देताना महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदी काटेकोरपणे तपासून मंजुरी देण्यात यावी.

२७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी 

१) हृदयविकाराचा झटका (Cardiac Emergency ) प्रमश्तिक संहनी (Cerebral Vascular) फुफ्फुसांच्या विकाराचा झटका (Pulmonary emergency) / अँजिओग्राफी चाचणी 

२) अति रक्तदाब (Hypertension) 

३) धनुर्वात ( Titanus) 

४. घटसर्प (Diphtheria)

५. अपघात (Accident) आघात संलक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधित (Cardiological and Vascular)

६) गर्भपात (Abortions )

७) तीव्र उदर वेदना / आंत्र अवरोध (Acute abdominal Pains / Intestinal Obstruction )

८) जोरदार रक्तस्त्राव (Severe Hemorrhage )

९) गॅस्ट्रो -- एन्ट्रायटिस (Gastro – Entireties)

१०) विषमज्वर (Typhoid) 

११) निश्चेतनावस्था

१२) मनोविकृतीची सुरूवात (Onset of Psychiatric Disorder)

१३) डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal Detachment In The Eye)

१४ ) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Gynaecological And Obstetric Emergency)

१५) जननमुत्र आकस्मिक आजार (Genito Urinary Emergency)

१६) वायू कोथ (Gas Gangrine)

१७) कान, नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार

१८) (Foreign Body in Ear, Nose or Throat Emergency) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अश जन्मजात असंगती (Congenital Anomalies Requiring urgent Surgical Intervention) 

१९) ब्रेन ट्युमर (Brain Tumour)

२०) भाजणे (Burns)

२१) इपिलेप्सी (Epilepsy)

२२) ॲक्युट ग्लॅकोमा (Acute Glaucoma)

२३) स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार

२४) उष्माघात

२५) रक्तासंबंधातील आजार

२६) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा

२७) रसायनामुळे होणारी विषबाधा

गंभीर आजार भाग २

१) हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery) 

२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (By Pass Surgery )

३) एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया

४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)

५) रक्ताचा कर्करोग (Blood Cancer)

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying