डोळ्यातील कोर्निया ची असाधारण वाढ होणे Congenital Corneal anomalies

Congenital Anomalies of Cornea - डोळ्यातील पारपटलाची असाधारण वाढ होणे

मित्रांनो आजचे लेखांमध्ये आपण डोळ्याच्या पारपटल ला लहानपणा पासून होणाऱ्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत..

जशी वयोमानानुसार लहानपणापासून शरीराची जशी वाढ होते त्यासोबतच डोळ्याची ही वाढ होत असते परंतु काही कारणांनी लहानपणी डोळ्यांची असाधारण वाढ होते यालाच आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये Congenital Anamalies ase मनतो. खालील प्रमाणे काही डोळ्याच्या असाधारण वाढ (Congenital Anomalies) याविषयीची माहिती बघूया.

1. मेगालोकॉर्निया (Megalocornea)

2. मायक्रो कार्निया (Microcornea)

3. कॉर्निया प्लॅना (Cornea Plana)


• मेगालोकॉर्निया (Megalocornea)

मेग्यालोकॉर्निया म्हणजे डोळ्यातील कॉर्निया या भागाचे डायमीटर हे तेरा मिलिमीटर पेक्षा जास्त असणे यालाच आपण मेग्यालोकॉर्निया (Megalocornea)असे म्हणतो.

डोळ्यातील कॉर्निया या भागाचे जन्म झालेल्या बाळाचे डायमीटर हे दहा मिलिमीटर इतके असते तर वयस्कर व्यक्तीमध्ये ते 11.7 इतकी असते.

परंतु डोळ्याची जन्मताच असाधारण वाढ झाल्यामुळे डोळ्याचे आडवे डायमीटर हे 13 मिलिमीटर आणि त्यापेक्षा जास्त होते. हा आजार असलेल्या व्यक्तीचे निदान हे दोन वर्षातच होते.

या आजारामध्ये साधारणतः कॉर्नियाची जाडी ही नॉर्मल असते आणि दिसायलाही नॉर्मल असते.

या आजारामध्ये लहान बाळाच्या डोळ्याची साईज ही साधारण नसून मोठी असते.

मेगालोकॉर्निया (Megalocornea)


• मायक्रो कार्निया (Microcornea)

मायक्रो कॉर्निया ( Microcornea) या आजारांमध्ये डोळ्याचे आडवी डायमीटर हे दहा मिलिमीटर पेक्षा कमी असते यालाच आपण मायक्रो करणे असे म्हणतो.

या आजारामध्येही डोळ्याची साधारण वाढ होते यामध्ये डोळ्याची जी नॉर्मल डायमीटर 11.7 असते परंतु यामध्ये डायमीटर दहा किंवा दहा पेक्षा कमी असते.

मायक्रो कार्निया (Microcornea)


कॉर्निया प्लॅना (Cornea Plana)

ह्या आजारा सहसा मध्ये दोन्ही डोळे एकत्रित बाधित होतात आणि यामध्ये कॉर्नियाचा आकार हा नॉर्मल पेक्षा जास्त चपटा होतो याला आपण Cornea Plana असे म्हणतो.

हा आजार सहसा Microcornea सोबत आढळून येतो.

Corneal plana झालेल्या रुग्णांना सहसा Astigmatism नावाचा Refractive Error होतो. अशा रुग्णांना दृष्टी वाढवण्यासाठी किंवा चष्म्याच्या नंबर मध्ये सिलेंडर नंबर लागतो.

मित्रांनो आपण वरील प्रमाणे असाधारण होणाऱ्या डोळ्याच्या वाढीबाबत माहिती घेतली. जर लहानपणापासून बालकांच्या डोळ्यांची वाढ व साधारण झाली तर त्यामध्ये पार पटल म्हणजेच कॉर्निया या भागाची साईज कधी कमी किंवा जास्त दिसतो. तसेच त्याच्या आकारामध्येही फरक जाणवतो. अशा प्रकारची लक्षणे जर तुम्हाला लवकर आढळून आल्यास त्यांना त्वरित नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरून त्यामुळे काही दृष्टीवर परिणाम झालेला आहे का ? आणि झालेला असेल तर त्यावर वेळीच उपचार केले तर आळशी डोळा होणे यालाच आपण Amblyopia असे म्हणतो त्यापासून आपण वाचू शकतो.

जर अशा आजाराचे वेळीच निदान झाले तर आपल्याला बालकाची दृष्टी  वाचवण्यात यश मिळते.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying