कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) म्हणजे काय ?

कॉर्निया (Cornea) म्हणजे काय ?

कॉर्निया (Cornea) हा डोळ्याचा बाहेरील आवरण असून डोळ्याचा सर्वात समोरील भाग आहे. कॉर्निया (Cornea) ला मराठीमध्ये पारपटल असे म्हणतो. कॉर्निया (Cornea) हा पारदर्शक भाग आहे ज्याचा उपयोग डोळ्यामध्ये प्रकाश फोकस करण्याचे काम तो करत असतो.
Corneal Ulcer



कॉर्निया (Cornea) हा स्कलेरा (Sclera) या भागावरती असा बसवलेला आहे जसा की घड्याळामध्ये काच बसलेला असतो. कॉर्निया हा डोळ्यामध्ये लाईटचे एकत्रित करतो व त्याचा एकत्रित करण्याचा पावर (Refractive Power) हा + 45 डायप्टर असतो जो की डोळ्यातील सर्वात जास्त आहे.

कॉर्निया (Cornea) हा डोळ्याचा भाग सर्वात जास्त लाईट एकत्रित करण्याचे काम करत असतो त्यासोबतच तो डोळ्याच्या आतील भागाचे संरक्षण करतो.

कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) म्हणजे काय ?


कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) म्हणजे काय ?

कॉर्नियाला इजा होऊन जंतुसंसर्ग (infection) होतो व त्या ठिकाणी अल्सर तयार होते त्यालाच आपण कॉर्नियल अल्सर (Corneal Ulcer) असे म्हणतो.

कॉर्निया हा डोळ्यातील सर्वात बाहेरील आवरण असल्यामुळे त्याचा संबंध हा वातावरणाची येत असतो त्यामुळे त्याला इजा होणे जंतुसंसर्ग जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते.

कॉर्निया हे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अश्रू मधील अँटेबॅक्टरियल सबस्टन्स द्वारे स्वतःचे संरक्षण करतो. 

कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) होण्याची कारणे कोणती ?

कॉर्नियल अल्सर हा कॉर्नियाचा गंभीर आजार आहे व त्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
• कॉर्नियाला जखम होणे
• कॉर्नियाला डोळ्यात कचरा गेल्यामुळे होते,
• पापणीचे केस आतल्या साईडने वळल्यामुळे होते, 
• कॉन्टॅक्ट लेन्स (Contact Lenses) वापरणाऱ्या व्यक्तीमध्येही  शकते 
• डोळ्यात कोरडेपणामुळे कॉर्नियाची लियर  सुकली जाते आणि त्यामुळेही कॉर्नियल अल्सर होते.
• डोळ्याला हात लागून किंवा कचरा गेल्यामुळे जखम होते आणि त्यामुळे कॉर्नियल अल्सर तयार होते.

कॉर्नियल अल्सर ची लक्षणे कोणती ?

• डोळा दुखणे 
• डोळ्यांमध्ये टोचणे
• डोळ्याला पाणी येणे
• उजेडामध्ये त्रास होणे
• दिसायला अंधुक दिसते
• डोळे लाल होतात.
• डोळ्याच्या पापणीला सूज येते
• डोळे उघडल्या जात नाही
• कॉर्निया (Cornea) वरती पांढरे पिवळे स्पॉट दिसणे.

कॉर्नियल अल्सर (Corneal Ulcer) होण्यासाठी कोणते ऑरगॅनिझम कारणीभूत ठरतात?

• कॉर्नियल अल्सर चे जंतुसंसर्ग होण्यासाठी खालील काही ऑरगॅनिझम ही कारणीभूत ठरत असतात यामध्ये खूप साधारणपणे आढळून येणारा ऑरगॅनिझम म्हणजे Staphylococcus Aureus आणि स्ट्रिप्टोकोस निमुनी ( Streptococcus Pneumoniae), Pseudomonas, इंटरोबॅक्टरियल .

कॉर्नियल अल्सर चे प्रकार कोणते आहेत ?

कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) हा एक जंतुसंसर्ग आजार आहे यामध्ये डोळ्याला मार लागून, इजा होऊन त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो आणि त्याचेच रूपांतर कॉर्नियल अल्सर (Corneal Ulcer)  मध्ये होते.

कॉर्नियल अल्सर चे प्रकार हे खालील प्रमाणे आहेत...
बॅक्टेरियल कॉर्नियल अल्सर : यामध्ये बॅक्टेरियाचा जंतू संसर्ग होऊन अल्सर तयार होते यालाच आपण बॅक्टेरियल कॉर्नियल अल्सर असे म्हणतो. या प्रकारातील अल्सर ही खूप साधारणतः आणि जास्त प्रमाणामध्ये आढळून येते.

फंगल कॉर्नियल अल्सर : यामध्ये फंगल म्हणजेच बुरशीचे जंतू संसर्ग होऊन डोळ्यांमध्ये अल्सर तयार होते यालाच आपण फंगल कॉर्नियल अल्सर असे म्हणतो.

व्हायरल कॉर्नियल अल्सर : यामध्ये व्हायरसचे जंतू संसर्ग होऊन डोळ्यांमध्ये अल्सर तयार होते याला आपण व्हायरल कॉर्नियल अल्सर असे म्हणतो.

पू युक्त कॉर्नियल अल्सर : यामध्ये डोळ्यातील अँटेरीवर चेंबर मध्ये पु तयार होतो यालाच आपण पू युक्त कॉर्नियल अल्सर (Purulent Corneal Ulcer)  असे म्हणतो. अशा प्रकारची अल्सर ही बॅक्टेरियल किंवा फंगल जंतुसंसर्ग झाल्यामुळे होत असते.
कॉर्नियल अल्सर ( Corneal Ulcer) म्हणजे काय ?


कॉर्नियल अल्सर होऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत ?


• डोळ्यामध्ये कचरा गेल्यास त्वरित थंड पाण्याची शिंपडे मारावे तसेच नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा.
• नेहमी चष्मा गॉगल चा वापर करावा जेणेकरून गाडी चालवताना डोळ्यांमध्ये हवा धूळ जाणार नाही आणि त्यामुळे डोळ्याला इजा होणार नाही.
• काम करत असताना डोळ्यांची काळजी घ्यावी.
• डोळ्यामध्ये कोरडेपणा असल्यास त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत.
• कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना व्यवस्थित लावावा आणि काढावा तसेच त्यासोबत त्याची स्वच्छता ही ठेवावी. बऱ्याच वेळा स्वच्छता नसल्यामुळे डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
• संगणक मोबाईल तसेच डिजिटल डिव्हायसेस चा वापर हा कामापुरता आणि मर्यादितच करायला हवा. त्यामुळे डोळ्याला कोरडेपणा होण्याची शक्यता असते.

कॉर्नियल अल्सर झाल्यास काय उपचार करावे ?

डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. डॉक्टर तुम्हाला आजाराची तीव्रता बघून काही अँटिबायोटिक आय ड्रॉप्स देतील.

कॉर्नियल अल्सर हा एक डोळ्याचा गंभीर आजार यावर जर लवकर उपचार घेतले तर तो बरा होतो परंतु जर दुर्लक्ष झाले तर डोळ्याला नेहमीसाठी पांढरेपणा म्हणजे डोळ्यावर टीक पडते. यालाच आपण डोळ्यात फुल पडणे (Corneal Opacity) असे म्हणतो.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying