Maharashtra Paramedical Council
मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना काही वेळा पेमेंट रिसिप्ट डाऊनलोड न होताच साईट एक्झिट होते अशा वेळेस काय करावे याविषयीची माहिती सविस्तर बघणार आहोत.
मित्रांनो सर्वप्रथम आपण जेव्हा महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन चा फॉर्म भरत असतो त्यावेळेस काळजीपूर्वक पेमेंट रिसिप्ट किंवा पैसे भरलेले ची पावती आपण डाऊनलोड करणे विसरू नये. कारण ती पावती आपणाला डॉक्युमेंट सोबत पॅरामेडिकल कौन्सिल कार्यालयाला पाठवायचे असते. आणि जर तुम्हाला पावती मिळाली नाही तर ती परत डाऊनलोडही करता येत नाही किंवा त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल सोबत कॉन्टॅक्ट करून डाऊनलोड करावी लागेल त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल.
जर तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल चा फॉर्म भरत असताना पेमेंट मिळाली नसेल तर ती मिळविण्यासाठी आपणाकडे दोन ऑप्शन आहेत.
पॅरामेडिकल कौन्सिल पेमेंट रिसिप्ट डाऊनलोड करण्यासाठी लागणारी माहिती.
Information required to download Paramedical Council receipt
1. तुम्हाला ऑनलाईन रेसिपी डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे ऑर्डर नंबर पाहिजे.
2. जर तुमच्याकडे ऑर्डर नंबर नसेल तर Epay reference ID पाहिजे
जर तुमच्याकडे वरील दोन ऑप्शन पैकी एक जरी असेल तर तुम्ही पेमेंट केलेली पावती डाऊनलोड करू शकता.
जर वरील सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे दोन्हीही ऑप्शन नसतील तर खालील प्रमाणे तुम्ही पावती मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकता.
Technique to download paramedical council payment receipt
1. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल सी संपर्क साधून तुम्ही तुमचा एप्लीकेशन नंबर सांगून त्यांच्याकडून ऑर्डर नंबर मिळू शकता. आणि ऑर्डर नंबर मिळाल्यानंतर तुम्ही स्वतः ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट डाऊनलोड करू शकता.
2. मित्रांनो दुसरे ऑप्शन हे माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे जर तुम्ही पेमेंट केले आणि तुम्हाला पेमेंट शिफ्ट मिळाली नाही तर तुमच्याकडे ऑर्डर नंबर आणि रेफरन्स आयडी नंबर नसतो त्यामुळे तुम्ही परत पेमेंट रिसीव डाउनलोड करण्यास अपात्र ठरता.
त्यासाठी तुम्हाला सिम्पल सी ट्रिक या ब्लॉगमध्ये सांगतो जर तुम्हालाही असाच प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही लगेच दुसऱ्या पेमेंट साठी प्रोसेस करावे (प्रोसेस करत असताना पेमेंट करायचे नाही) आणि प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला त्यावरती दिसेल की ऑर्डर नंबर नोट करून घ्यावा किंवा कॉपी करून घ्यावा. जर नवीन ऑर्डर नंबर चा शेवटचा नंबर हा 55 असेल तर तुम्ही परत डाऊनलोड रिसिप्ट या लिंक वरती जाऊन कॉपी केलेला ऑर्डर नंबर टाकावा परंतु शेवटचा जो नंबर आहे जसे की 55 च्या ऐवजी 54 नंबर टाकावा.
टाकल्यानंतर तुम्ही डाऊनलोड करून चेक करावे किती रिसिप्ट तुमचीच आहे का. नसेल तर परत त्यापेक्षा एक नंबर आणखी कमी करावा जसे की 53.
अशाप्रकारे तुम्ही तुमची रिसिप्ट डाऊनलोड करू शकता
तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रांनाही पाठवा.