निपा (nipah) विषाणूचा प्रसार कसा होतो | लक्षणे आणि उपचार

केरळ येथे निपा विषाणू आजाराने दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज रोजी आजाराचा आपल्या राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक असून निफा सदृश्य आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरावर होणे तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

निपाह व्हायरस


निपा विषाणू सर्वप्रथम 1998 मध्ये मलेशियामध्ये आढळला. भारतात सिलिगुडी 2001 आणि 2007 या पश्चिम बंगालमधील भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वी झाला होता.

बांगलादेशात या आजाराचे उद्रेक दरवर्षी दिसून येतात. केरळ येथे 2018 व 2021 रोजी कोजीकोंड येथे निपा आजाराचा उद्रेक झाला होता. 

निपा विषाणूचा प्रसार कसा होतो ?

• या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळावर जगणाऱ्या वटवाघळाच्या मार्फत होतो. 

• वटवाघड्यांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. 

• डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील याची बाधा होऊ शकते.

• 1998 च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते.

• निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते.

• रुग्णावर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी रुग्ण सेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते.

• वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो.

आदिशयन कालावधी 5 ते 14 दिवस

निपा आजाराची लक्षणे 

निपा विषाणू आजारात ताप अंगदुखी डोकेदुखी झोपाळूपणा मानसिक गोंधळ उडणे बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात

आज वरील उद्रेकात मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के एवढे आहे.

निपा आजारावरती उपचार

नीता विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही रॉबिन हे विषाणूविरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणे आधारे उपचार आणि सहाय्यभूत सुश्रुषा यावर भर दिला जातो.

निपा आजाराचे निदान कसे करावे ?

निपा विषाणूच्या निदानासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा नाक स्त्राव मूत्र, रक्त या नमुन्याची तपासणी राष्ट्रीय विज्ञान संस्था पुणे येथे करण्यात येते.

सर्वेक्षण

दीपा विषाणू आजाराच्या या पार्श्वभूमीवर आपण आपल्या राज्यात जिल्ह्यात सावध राहून ए इ एस रुग्णांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.

संशयित निपा

रुग्णताप डोकेदुखी झोपाळूपणा मानसिक गोंधळ उडणे बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदू जोरात व इतर मेंदू जरा करता निगेटिव्ह असणे आणि मागील तीन आठवड्यात निपा बाधित भागांमध्ये विशेषतः केरळ ईशान्य भारतात अथवा बांगलादेश मेलगच्या भागात प्रवासाचा इतिहास असणे.

आशा वर्णनाचा कोणत्याही रुग्णसंशयित निपा विषाणू रुग्ण म्हणून गृहीत धरावे असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे त्याचा नमुना एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात यावा.

प्रतिबंधात्मक खबरदारी

डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णू उपचार आणि सुश्रुषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या युनिव्हर्सल प्रिकोशन नुसार आवश्यक खबरदारी घ्यावी.

शेतात जंगलात अथवा इतरत्र पडलेले फळे खाणे टाळावे.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying