डीजे सोबत लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने त्याचे दुष्परिणाम डोळ्यावरती जाणून आलेले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील तब्बल 21 जणांच्या दृष्टी पाटलावर परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती आलेली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर डीजे सोबत लेझर लाईट चा वापर करण्यात आला. या लेझर लाईट मुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील 15 जणांच्या डोळ्याच्या रेटीनाला इजा होऊन त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळले आहे.
काय आहे लेझर बर्न ?
लेझर लाईटची तीव्रता खूप जास्त असते जे युवक या लेझर फ्रिक्वेन्सीच्या लिंक वर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लहानपणी आपण भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचं तसेच प्रकार लेझर लाईट तरुणांवर करत आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकी दरबार डीजे सोबत असलेले जर लाईट पडल्याने नेत्र पटलावरील रेटिनास इजा होऊन दृष्टीवर परिणाम होण्याचे प्रकार घडत आहेत अशाच प्रकारे जर तरुणांची दृष्टी अचानक कमी होत असेल तर ही बाब धोकादायक आहे मिरवणुकीत लेझर किरणाचा वापर बंद करायला हवा.
Tags:
Laser light