कै. अरुण काशीराम चौधरी यांचे मरणोत्तर नेत्रदान (Eyedonation)
मौजे माळेगाव ता. जि. वाशिम येथील अविनाश अरुण चौधरी यांचे वडील स्व. अरुण काशीराम चौधरी यांच्या वयाच्या 54 व्या वर्षी दिनांक 16/10/2023 रोजी रात्री 7.30 वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपूर्ण चौधरी कुटुंबातील आधारस्तंभ सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. अरुण काशीराम चौधरी यांचे निधन झाल्याने संपूर्ण चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना चौधरी कुटुंबीयांनी एवढ्या दुःखामध्येही मृत्यूनंतर नेत्रदान करून दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. बेदरकर डॉ. पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक श्री रमेश ठाकरे यांनी स्व. अरुण काशीराम चौधरी यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे लगेच गणपती नेत्र रुग्णालय जालना कडे पाठविण्यात आली तरी सदरील नेत्रदान करण्याकरिता श्री. प्रमोद चौधरी व सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळी सक्रिय सहभाग घेऊ नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरित नेत्रदान घडून आणावे व नेत्रदानंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे अशी आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असून चौधरी कुटुंबाचे आभार मानले आहेत
नेत्रदानासाठी संपर्क : 9922519948 जिल्हा रुग्णालय वाशिम