कुष्ठरोगाची लागण झाल्यास काय करावे आणि काय करू नये याविषयी आजच्या या लेखामध्ये आपण माहिती बघणार आहोत.
चला पुढे येऊ, कुष्ठरोगाचा नाश करू
कृपया हे करा -
• संवेदनहीन डाग आढळल्यास नियमित त्याची तपासणी करा.
• कुष्ठरोगाची लागण झाल्यास "एम डी. टी." चा उपचार घ्या.
• "एम डी. टी." च्या उपचारांचा त्वरित लाभ घ्या.
• कुष्ठरोग पूर्ण बरा होण्यासाठी किंवा दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी संपूर्ण उपचार घ्या.
हे करू नका -
• त्वचेवरील डागांच्याबाबतीत निष्काळजी राहू नका.
• कुष्ठरोगाला घाबरू नका, "एम डी. टी." चा उपचार घ्या.
• आरोग्य केंद्रातून मिळणारी सेवा घेण्यास दिरंगाई करू नका. "एम डी टी" च्या सेवनात अनियमितता ठेऊ नका.
कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्वीकार करू या !
कुष्ठरोगाची लक्षणे
• अंगावरील फिकट लालसर चट्टा
• चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी
•हाता पायांमध्ये बधिरता व शारीरिक विकृती
यासंदर्भातील औषधोपचारांची मोफत सुविधा सर्व शासकीय / निमशासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे
कुष्ठरोगासाठी तपासून घ्या तीन गोष्टी....
• तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा, कालांतराने जाड झालेल्या कानांच्या पाळ्या, विटळ झालेले भुवयांचे केस आणि अंगावरील गाठी
• शटीटावरील त्वचेपेक्षा फिक्कट किंवा लालसर रंगाचा, त्रास न देणारा, बऱ्याच दिवसांचा कुठलाही डाग चट्टा
• हाता-पायांना सुन्नपणा/बधीरता, स्पर्शज्ञान नसणे. स्नायूंचा अशक्तपणा व डोळा, चेहटा, हात किंवा पायांची विकृती
लक्षात ठेवा ! लवकर निदान-लवकर उपचार, निरोगी ठेवा आपला परिवार...
कुष्ठरोग हा दैवी कोप नाही, तो अनुवांशिकही नाही.
कुष्ठरोग मुक्त झालेल्यांच्या पुनर्वसनास सहाय्य करा...
Tags:
कुष्ठरोग