आरोग्य विभाग भरती गट क व गट ड पात्र उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना
१. पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी ठिक ०९.३० वाजता सुरु होईल. सर्व उमेदवारांनी समुपदेशनाचे ठिकाणी स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात सकाळी ०९.३० वाजता उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
२. जे उमेदवार सकाळी ०९.३० नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल.
३. समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार अनुपस्थित राहतील त्यांचा नियुक्ती करता विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवाराने त्यांना काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसल्यास कारणांच्या पुराव्यासह व पत्र, फोन करावा किंवा प्रतिनिधी पाठवावा. प्रतिनिधीनां केलेले नियम उमेदवारांस बंधनकारक राहतील.
४. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांच्या मुळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल याकरिता सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्याची एक एक स्वसाक्षांकित प्रत तयार ठेवावी. सदर तपासणी १०.०० पासून सुरु करण्यात येईल.
५. मूळ प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही. अशा उमेदवारांच्या नेमणुकीबाबत विचार करण्यात येणार नाही.
६. प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहामध्ये समुपदेशन व नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपुर्वक समजावून घ्यावी व काही शंका असल्यास त्याचे निरसन तेथेच करुन घ्यावे.
७. निवडीसाठी पात्र उमेदवारांची संवर्गनिहाय अतंर्गत गुणवत्ता सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल.
८. समुपदेशनास जाण्यापुर्वी उमेदवारांने सभागृहात व सूचना फलकावर त्याच्या संवर्गातील रिक्त पदांची माहिती काळजीपुर्वक पहावी व वर नमुद उपलब्ध पदांमधुन त्यांच्या पसंतीची २ ते ३ ठिकाणे निवडावीत.
९. समुपदेशन समितीकडे परिशिष्ट अः मधील समुपदेशन नमुना सादर करावा व उमेदवाराने निवडलेल्या २ ते ३ ठिकाणांमधून एक ठिकाण अंतिम करावे.
१०. उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यांमध्ये करण्यात येईल त्यामुळे रिक्त पदांमध्ये बदल होत राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्यानुसार पसंतीक्रमामध्ये सुधारणा करावी.
११. उमेदवाराने पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील. यानंतर उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही.
१२. उमेदवाराने व समुपदेशन समितीने पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराचे नियुक्ती आदेश तयार करण्यात येईल.
१३. उमेदवाराने सदर नियुक्ती आदेश तपासून त्यात नमूद आपले नांव, प्रवर्ग, पदाचे नांव. पदस्थापनेचे ठिकाण इत्यादी तपशील बरोबर आहे याची खात्री करुन घ्यावी व नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोच पावती दयावी.
१४. उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी तात्काळ समुपदेशन समितीस सुचित करावे. सदर उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्विकारला जाणार नाही.
१५. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलून देता येणार नाही.