शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रथम नियुक्तीनंतरच्या कार्यवाहीबाबत

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रथम नियुक्तीनंतरच्या कार्यवाहीबाबत


गट अ, ब, क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रथम नियुक्तीनंतरच्या कार्यवाहीबाबत.

उपरोक्त विषयी विभागातील गट- अ, ब, क व ड मधील रिक्त पदे ही नामनिर्देशनानुसार भरण्यात आली आहेत. त्यान्वये अधिकारी / कर्मचारी यांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांचे आस्थापना विषयक बाबीची खालीलप्रमाणे पूर्तता करणे आवश्यक आहे.

Download PDF

अ) सेवा पुस्तकातील नोंदी

1. प्रथम नियुक्तीनंतर अधिकारी / कर्मचारी यांचे मुळ सेवा पुस्तक तयार करावे व खालील आवश्यक नोंदी घ्याव्यात.

2. कर्मचा-याचे संपूर्ण नाव

3. कर्मचा-यांची जात व जात वैधता, जन्मतारीख यांची नोंद घ्यावी.

4. शैक्षणिक अर्हता, घोषित केलेले स्वग्राम पत्ता, वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद, कर्मचा-यांची स्वाक्षरी, कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी.

5. कर्मचा-याचे भविष्य निर्वाह निधी / गट विमा योजनचे नामनिर्देशन प्रत.

6. मृत्यु नि सेवानिवृत्ती उपदान / कुटुंब निवृत्ती वेतनाचे नामनिर्देशन प्रत.

7.GIS वर्गणीदार होणेबाबत आवश्यक प्रस्ताव सादर करुन तद्‌नुसार GIS नोंद सेवा पुस्तकात घ्यावी.



ब) सेवा विषयक बाबी

8. नियुक्तीनंतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडून गुप्ततेची व राष्ट्रीयत्वाची शपथ घ्यावी व तसे शपथपत्र विहित प्रपत्रात लेखी स्वरुपात घ्यावे.

9. अधिकारी / कर्मचारी यांचे ओळखपत्र तयार करावे.

10. सेवार्थ प्रणालीत नोंद घेणेबाबत कार्यवाही करावी.

11. भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव संबंधित महालेखाकार कार्यालयात सादर करावा.

12. अधिकारी / कर्मचारी यांना नामनिर्देशन नमुना सादर करणेबाबत अवगत करावे.

13. साक्षांकन नमुन्यात उमेदवारानी नमूद केलेल्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या पोलीस कार्यालयाकडून त्यांची चारित्र्य पडताळणी करुन घेण्यात यावी व तशी नोंद सेवा पुस्तकामध्ये घ्यावी.

14. संबंधित पदाकरीता शारीरिक दृष्ट्या पात्र आहे किंवा कसे? याकरिता उमेदवाराची वैद्यकीय तपासणी संबंधित वैद्यकीय मंडळाकडून करुन घेण्यात यावी व अहवालानुसार नोंद सेवा पुस्तकामध्ये घ्यावी.

15. नियुक्तीवेळी जात वैधता प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास ०६ महिन्याच्या मुदतीत प्रस्ताव संबंधित जात वैधता समितीकडे पाठवून पडताळणी करुन घ्यावी.

16. हिंदी / मराठी भाषा परिक्षेसंबंधिच्या नियमावली नुसार जर उमेदवार या अगोदरच उत्तीर्ण झाले नसेल किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर सदर उमेदवारास एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी विषयाची निम्नस्तर / उच्चस्तर परिक्षा संबंधिताने विहित मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

17. नियुक्तीवेळी शासनाने अधिकृत केलेले संगणक प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधिताने विहित मुदतीत संगणक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

17. पदनिहाय विहित अर्हतेनुसार आवश्यक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण केल्याबाबतची नोंद सेवा पुस्कात घेण्यात घ्यावी.

18. अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवेचे १/२ वर्षाचे परीविक्षा कालावधी पूर्ण झाल्याबाबत प्रस्ताव विहित परीविक्षा कालावधीचे वर्ष पूर्ण होताच वरिष्ठ कार्यालयास सादर करावे व आदेशांची नोंद सेवा पुस्तकात घ्यावी.

19. अधिकारी / कर्मचारी यांचे नियमित सेवेचे ३ वर्ष पूर्ण होताच परीपूर्ण स्थायीत्व प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करावा व आदेश प्राप्त होताच सेवा पुस्तकात नोंद घ्यावी.

 20. NPS परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन वित्त विभाग शासन निर्णय क्र. अंनियो - १००५/ १२६/ सेवा-४, दि.३१ ऑक्टोंबर, २००५ च्या तरतूदीनुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार विकल्प घ्यावा.

21. शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर वेपूर २०१९/प्र.क्र.१/ सेवा- ९, दि.३० जानेवारी, २०१९ नुसार विसंगत वेतननिश्चितीच्या परिणामी किंवा पुढे वेतननिश्चितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे अतिप्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास ते संबंधित उमेदवारांस प्रदान करण्यात येणा-या रकमेतून समायोजित करुन किंवा इतर प्रकारे शासनास परत करीन असे वचन पत्र लेखी स्वरुपात घेण्यात यावे.

सर्व कार्यालयप्रमुख यांनी त्यांचेकडे रुजू झालेल्या नवनियुक्त अधिकारी / कर्मचारी यांच्याबाबत वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा विषयक बाबीबाबत भविष्यात अडचणी/ न्यायालयीन प्रकरणे इ. उद्भवणार नाहीत.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying