डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन

 डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन 

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन

  राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत प्रतिवर्षी १० जुन हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी नेत्र तपासणी शिबीरे आयोजित करुन त्याव्दारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. डॉ. भालचंद्र यांचे संपूर्ण नाव डॉ. रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र असे होते. त्यांचा जन्म १० जुन १९२६ ला झाला आणी त्यांचा मृत्यु १० जुन १९७१ मध्ये झाला योगायोग असा की, त्यांचा जन्म देखील १० जुन व मृत्यु देखील १० जुन रोजीच झाला. डॉ. भालचंद्र हे प्रख्यात नेत्रशल्य चिकीत्सक होते. त्यांच्या जिवन कालावधीत कुठलिही आधुनीक सोयसुविधा नसतांना अंधत्व निर्मूलन कार्य करुण हजारो यशस्वी मोतिबींदु शस्त्रक्रिया केल्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत १० जुन ते १६ जुन डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जातो, शासकीय सेवेतील नेत्रशल्य चिकीत्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मनराव भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. खडतर परिस्थीतीवर मात करुन त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर ८० हजाराहून अधिक नेत्रशस्त्रक्रिया पूर्ण करुण नेत्रहिनांचे जिवन प्रकाशमय केले. नेत्रदानासारख्या महान कार्याचे महत्व देखील त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य केले. नेत्रदान हे अंध व्यक्तीच्या जिवनात प्रकाश आनतो. नेत्रदान करून अंधाना जिवन जगण्यासाठी हे नेत्र फार उपयोगी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. मरनोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळते त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदान करणे आवश्यक आहे. एका वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करु शकते, एखादया व्यक्तीला चष्मा लागला असेल, डोळयांचे ऑपरेशन झाले असेल, मोतिबींदु शस्त्रक्रिया झालेली असेल, तसेच उच्च रक्तदाब/मधुमेह असणारे व्यक्तीसुदधा नेत्रदान करु शकतात. 

*नेत्रदानविषयी थोडक्यात माहिती*


*नेत्रदान कोणाला करता येते.*

• काही दिवसाच्या बालकापासुन ते १०० वर्षाच्या स्त्री पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होउ शकते.

 • नेत्रदान करण्यासाठी वयोमर्यादा नाही.

• चष्मा लावणारे, मोतिबीदु शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह व उच्च रक्तदाब् असलेले रुग्णदेखील नेत्रदान करु शकतात.


*नेत्रदान कोण करु शकत नाही.*

• एडस्, रेबीज, काविळ, कर्करोग, धनुर्वात किवा विषानुपासून होणारे रोग व नेत्रपटलाचे रोग असणा-यांना नेत्रदान करता येत नाही. परंतु हे नेत्र पटल संशोधनासाठी वापरतात.


*नेत्रदानाबद्दल काही महत्वाचे*

• नेत्रदान मृत्यु नंतर सहा तासाच्या आत करावे.

• जगातील एकुण नेत्रहिन व्यक्तिपैकी २० टक्के भारतात आहेत त्यामध्ये ३० ते ४० हजार व्यक्तीचे दरवर्षी भर होते

• नेत्ररोपन म्हणने संपुर्ण डोळयाचे नेत्ररोपन नव्हे तर फक्त बाहय पटलाचे रोपन होय.

• नेत्रदान हे मरनोपरांत करावयाचे असते.

• नेत्रदानाचे संमतीपत्र भरुन जवळच्या नेत्रपेढ़ी, डोळयांचे डॉक्टर किंवा फॅमीली डॉक्टरांकडे दयावे

• संमतीपत्र भरलेले नसले तरी जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.

• नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीचे अंधत्व दुर करने शक्य आहे.

• नेत्रदानानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विदृप होत नाही.


*नेत्रदान कसे करावे*

• मृत व्यक्तीबद्दल जवळच्या नेत्रपेढ़ी, फॅमीली डॉक्टर, सामाजीक कार्यकर्ते, किंवा डोळयांचे डॉक्टरांना फोनव्दारे कळवावे.

• मृत व्यक्तीच्या खोलीतील पंखा बंद करुण डोळयावर ओल्या कापडाच्या किंवा कापसाच्या पट्ट्या ठेवाव्या.


"नेत्रदान चळवळीत सामील व्हा, नेत्रदानाचा प्रचार करा व अंध व्यक्तीचे जिवन प्रकाशमय करा."


राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत खालील प्रमाणे मोफत सुविधा देण्यात येतात.

1) नेत्र विभागामध्ये नेत्र तपासणी करण्यात येते.

२) ४० वर्षावरील आर्थीक दृष्ट्या मागास व्यक्तीना जवळचे दिसण्यासाठी चष्मे देण्यात येतात.

3)मोतिबीदु शस्त्रक्रिया करण्यात येतात.

4) शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करुन दृष्टीदोष आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात येतात.

५) मधुमेह आणी उच्चरक्तदाब रुग्णांची डोळ्याच्या मागील पडद्याची तपासणी करण्यात येते.

Post a Comment

0 Comments