मोतीबिंदू म्हणजे काय ?
मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक सामान्य आजार आहे ज्यामध्ये डोळ्यातील नैसर्गिक लेन्स (Crystalline Lens) धूरकट होऊ लागतो यामुळे दृष्टी अस्पष्ट होते यालाच आपण मोतीबिंदू झाला असे म्हणतो.
मोतीबिंदू होण्याची काही कारणे:
मोतीबिंदू होण्याची वेगवेगळे कारणे आहेत त्यापैकी काही कारणे खालील प्रमाणे आहेत...
वय: वय वाढल्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. शक्यतो पन्नास वर्षाच्या वरील व्यक्तीस मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. या वयात होणारा मोतीबिंदू हा वयोमानानुसार होणारा मोतीबिंदू असतो.
मधुमेह: ज्या रुग्णाला मधुमेह चा त्रास असतो अशा लोकांमध्ये मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. तरी मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांनी मधुमेहाचा उपचार घेऊन मधुमेह शक्यतो नॉर्मल ठेवावा जेणेकरून मधुमेहाचा डोळ्यावर काहीही दुष्परिणाम होणार नाही.
डोळ्याची दुखापत: डोळ्याला मार लागल्यामुळे दुखापत होऊन डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होतो.
काही औषधे: काही प्रकारच्या औषधांचा दीर्घकाळ उपयोग केल्याने मोतीबिंदू होऊ शकतो.
कुटुंबीय इतिहास: जर कुटुंबात मोतीबिंदूचा इतिहास असेल तर त्याची शक्यता वाढते.
मोतीबिंदूची लक्षणे:
डोळ्याला मोतीबिंदू झाल्यानंतर खालील प्रमाणे लक्षणे आढळून येतात....
1. दृष्टी अस्पष्ट होणे
2. प्रकाशाभोवती हेलो दिसणे
3. रंगांचे फिकट दिसणे
4. वाचन करताना अडचण येणे
5. रात्रीच्या वेळी दृष्टी कमी होणे
मोतीबिंदूचा उपचार:
शस्त्रक्रिया: मोतीबिंदूचा उपचार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेत धूरकट झालेला लेन्स काढून टाकला जातो आणि त्याच्या जागी कृत्रिम लेन्स (Artificial Lens) बसवला जातो.
मोतीबिंदूची काळजी:
1. नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या.
2. मधुमेह नियंत्रणात ठेवा.
3. धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
4. स्वस्थ आहार घ्या.
जर तुम्हाला मोतीबिंदूचे काही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब नेत्रतज्ञांशी संपर्क साधा.